BSNL Christmas Bonanza Offer : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यामुळे ग्राहकांचा ओढा सरकारी मालकीच्या 'भारत संचार निगम लिमिटेड'कडे वाढला आहे. आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे औचित्य साधून बीएसएनएलने आपल्या नव्या ग्राहकांसाठी 'ख्रिसमस बोनान्झा' ही विशेष ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत नवीन युजर्सना केवळ १ रुपयात महिनाभर मोफत सेवा मिळणार आहे.
काय आहे '१ रुपया'चा प्लॅन?
बीएसएनएलच्या या विशेष ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ १ रुपया खर्च करून अनेक फायदे मिळणार आहे.
- व्हॅलिडिटी : पूर्ण ३० दिवसांची वैधता.
- कॉलिंग : कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग.
- डेटा : दररोज २ जीबी (२GB) हाय-स्पीड डेटा.
- एसएमएस : दररोज १०० फ्री एसएमएस.
- फ्री सिम कार्ड : नवीन सिम कार्डसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
#Christmas deal alert! 🎄
— BSNL India (@BSNLCorporate) December 22, 2025
Sirf ₹1 mein FULL CONNECTIVITY! 📶
New BSNL SIM lo aur enjoy karo
30 days validity, 2GB/day data, 100 SMS/day and unlimited calling.
Solid network. Solid vibes.#ChristmasBonanza#BSNLIndia#BSNLPlans#NetworkSolidHaipic.twitter.com/bNjjDkkkR6
ऑफरची मुदत आणि अटी
ही ऑफर केवळ अशा लोकांसाठी आहे जे नवीन बीएसएनएल सिम खरेदी करतील किंवा आपले जुने सिम बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील. ही 'ख्रिसमस बोनान्झा' ऑफर ५ जानेवारी २०२६ पर्यंत वैध आहे. ५ जानेवारीपूर्वी नवीन सिम घेणाऱ्यांनाच या १ रुपयाच्या प्लॅनचा लाभ घेता येईल.
वाचा - स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
५जी कडे वेगाने वाटचाल
बीएसएनएल केवळ स्वस्त प्लॅन्सवरच थांबलेले नाही, तर आपल्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्येही मोठी सुधारणा करत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये बीएसएनएलची ४जी सेवा यशस्वीपणे सुरू झाली आहे. सध्या बीएसएनएल ५जी नेटवर्कवर वेगाने काम करत असून, लवकरच ग्राहकांना ५जी च्या हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेता येणार आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत.
